राहुल गांधी अट्टल व्यसनी दिसतात! अकाली दलच्या आमदाराची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्लीतील अकाली दलाच्या मनजिंदर सिंग सिरसा नावाच्या एका आमदाराने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केली आहे. राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ पोस्ट करीत या आमदाराने म्हटलंय की पंजाबमधील ७० टक्के युवक हे ड्रग अॅडीक्ट असल्याचं विधान करणारे राहुल गांधी या व्हिडीओमध्ये अट्टल व्यसनी दिसत आहेत.

राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान बनण्याच्या लायकीचे नसून ते नशामुक्ती केंद्रात दाखल होण्याच्या लायकीचे असल्याचं विधान करत या आमदाराने त्यांची पातळी ओलांडली. सिरसा यांनी केलेल्या या ट्विटवर अनेकांनी आक्षेप नोंदवत त्यांची भाषा योग्य नसल्याचं म्हटलंय.