सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रक्रियेची दखल घ्यावी: अखिलेश यादव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अशी मागणी केली आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निवडणूक प्रक्रियेची दखल घ्यावी’.

एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अखिलेश यादव म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निवडणूक प्रक्रियेची दखल घ्यावी आणि मतमोजणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जनतेला उपलब्ध करून द्यावे’.

‘जेव्हा न्यायालयाचे कामकाज थेट प्रक्षेपित होऊ शकते, तर मतमोजणीचे थेट प्रक्षेपण का होऊ शकत नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘सीसीटीव्ही लाईव्ह का नाही? त्यांना कशाची इतकी भीती वाटते? आमची मागणी आहे की सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील निवडणुकांची तात्काळ दखल घ्यावी आणि मतमोजणीचा व्हिडिओ देशातील जनतेसमोर ठेवावा’, असे ते म्हणाले. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.