अक्षयच्या ‘बच्चन पांडे’ सिनेमातील लुकची चर्चा

अभिनेता अक्षयकुमारच्या ‘बच्चन पांडे’ या सिनेमाची चर्चा रंगू लागली आहे. या अॅक्शन कॉमेडी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. तसेच त्यातील अक्षयचा फर्स्ट लुक समोर आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये ‘बच्चन पांडे’बाबत उत्सुकता पाहायला मिळते.

अक्षयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बच्चन पांडे’ मधील लुक शेअर केला आहे. त्यामध्ये गळ्यात चेन, डोक्याला रुमाल, कानात बाली, तसेच एक डोळा निळसर असलेला अक्षय दिसत आहे. त्याचा एक लुक पुरेसा आहे. ‘बच्चन पांडे’ सिनेमा 26 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार अशी कॅप्शन अक्षयने फोटोला दिली आहे. अक्षयसोबत जॅकलीन फर्नांडिस, क्रिती सेनॉन आणि अरशद वारसी यांच्याही भूमिका चित्रपटात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या