‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची 25 कोटींची मदत

3466
अक्षय कुमार : खरे नाव - राजीव भाटिया

कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. मोठमोठे उद्योजक, खेळाडू आणि कलाकार देश वाचवण्यासाठी मदत करत आहे. आता यात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचेही नाव जोडले गेले आहे. अक्षय कुमार याने पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये 25 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यानंतर त्यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. अक्षय कुमारने देखील मदतीची घोषणा केली.

ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत अक्षय कुमार म्हणाला की, सध्या प्रत्येकाचा जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपल्याला जमेल तेवढी मदत करायला हवी. मी देखील माझ्या बचतीमधून 25 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा करत आहे. चला जीव वाचवूया, कारण ‘जान है तो जहान है’, असे अक्षय कुमार म्हणाला.

img-20200328-wa0032

आपली प्रतिक्रिया द्या