जिल्हा पोलीस दलाकडून राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याकरिता त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त अलिबाग क्रीडा भवन येथे सकाळी सात वाजता राष्ट्रीय एकता दौड 2019 अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे,जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत लहानापासून आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, अभिनेता देवदत्त नागे,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अजित गवळी, आदी मान्यवर यांच्या उपस्थित एकता दौडचा शुभारंभ झाला. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आला. एकता दौड ही जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा विभागाकडून आयोजित केली होती.

अलिबाग समुद्र किनारा येथून एच पी पंप अशी ही एकता दौड घेण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरिकांसह तरुण तरुणींनी सहभाग घेतला. या राष्ट्रीय दौडमध्ये पोलीस दलाचे जवान, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, खेळाडू, क्रीडा संघटना, व्यापारी, सर्व नागरिकांनी सहभाग घेतला.