अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ स्पर्धा 18 ऑक्टोबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हीरक महोत्सवाकडे पुढील वर्षी वाटचाल करणाऱया माझी माऊली देवी-सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ, जे.जे. हॉस्पिटल परिसर भायखळातर्फे तसेच इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट व आयडियल स्पोर्टस् ऍकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल हिंदुस्थानी स्तरावर खुली ऑनलाइन मोफत प्रवेशाची बुद्धिबळ स्पर्धा 18 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना मान्यतेने होणाऱया स्पर्धेला विभागीय आमदार यामिनी जाधव व स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांचे सहकार्य लाभले आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण 10 रोख पुरस्कार दिले जाणार आहेत.

स्विस लीग पद्धतीने लीचेस प्लॅटफॉर्मवर साखळी 14 फेऱयांमधील प्रत्येक स्पर्धकाचा सामना 3 मिनिटे वेळेचा होईल. अरेना इंटरनॅशनल मास्टर राजाबाबू गजंगी, इंटरनॅशनल आर्बिटर प्रेम पंडित आदी प्रमुख पंचांच्या मंडळास शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, चंद्रकांत करंगुटकर सहाय्य करणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱया स्पर्धकांनी प्रवेशासाठी तसेच अधिक माहितीसाठी मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजंगी (9324719299) यांच्याकडे 15 ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा.

प्रतिवर्षी भव्य दिव्य पद्धतीने होणारा नवरात्रोत्सव यंदा कोरोना संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करीत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सामाजिक-आरोग्यविषयक माहितीची जनजागृती 59व्या माझी माऊली देवीच्या नवरात्र महोत्सव कालावधीत मंडळाचे पदाधिकारी दत्ता राणे, कृष्णा रेणोसे, दिलीप करंगुटकर, भूषण परुळेकर, अनिल शेलार, चंद्रकांत करंगुटकर, विनोद पाताडे, प्रमोद पाताडे, भरत वालावलकर, प्रकाश राठोड, संजय आंब्रे, गौतम कांबळे, अशोक मुल्की, सागर कवडे, ओमकार बाणे, संदेश शेलार, अनिल नेवगी, अनिकेत करंगुटकर, प्रफुल्ल सुर्वे, अरुण मोरे, प्रतीक पाताडे आदी मंडळी विशेष प्रयत्न करणार आहेत. पुढील वर्षी हीरक महोत्सवात विभागीय आमदार यामिनी जाधव व स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या सहकार्याने मंडळाचा सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा, सांस्कृतिकविषयक लोकोपयोगी उपक्रम साकारण्याचा निर्धार आहे.