चेन्नईचा प्रणव विजेता, अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल हिंदुस्थानी 12 वर्षांखालील मुलामुलींच्या मोफत ऑनलाईन विश्वाचा राजा बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईच्या प्रणव के.पी.ने अपराजित राहून 9पैकी 8.5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. पश्चिम बंगालच्या स्वप्नील करने 7.5 गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमीतर्फे ओमकार बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-दादर पश्चिम, इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंस व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने स्विस लीग पद्धतीने साखळी नऊ फेऱयांमध्ये ऑनलाईन लिचेस प्लॅटफॉर्मवर ही स्पर्धा संपन्न झाली.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड राज्यातील खेळाडूंनी उत्तम खेळ करून स्पर्धेत रंगत आणली. मुंबईच्या दक्शील काजरोळकरने (7 गुण) तृतीय, हरियाणाच्या मनराज सिंगने (6.5 गुण) चौथा, नागपूरच्या श्रद्धा बजाजने (6.5 गुण) पाचवा, जमशेदपूरच्या नाविका जैस्वालने (6.5 गुण) सहावा, चेन्नईच्या कृष्णा एडनने (6 गुण) सातवा तर मुंबईच्या जयवीर पाटीलने (6 गुण) आठव्या क्रमांकाचा रोख पुरस्कार जिंकला. मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सेव्रेटरी राजाबाबू गजंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व ओमकार बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सेव्रेटरी राजन राणे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.