
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
17 व्या लोकसभेसाठी झालेली निवडणूक विविध कारणांमुळे गाजली. खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमधील रंजक माहितीच्याही अनेक खुसखुशीत बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यात कुणी करोडपती तर कुणावर गुन्हेगारी खटले तर कुणाची संपत्ती 500 रुपयेही नाही अशी विविध प्रकारची माहिती बाहेर आली. ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ आणि ‘एडीआर’ने 542 पैकी 539 खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले असून त्यानुसार 542 पैकी तब्बल 233 खासदारांवर गुन्हेगारी खटले आहेत, तर 475 खासदार करोडपती असल्याचे उघड झाले आहे.

– तीन खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले नाही. यात दोन भाजपचे आणि काँग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे.
– 19 खासदारांवर महिलांवर अत्याचाराशी संबंधित खटले दाखल आहेत. यात तीन खटले बलात्काराचे आहेत.
– गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सर्वाधिक गुन्हेगारी खटले असलेले खासदार निवडून आले आहेत.






























































