
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर आणि धवलसिंह झाला यांनी शुक्रवारी गुजरात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधात मतदान केल्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गांधीनगरमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि ओबीसी नेते जुगल ठाकूर तर काँग्रेसकडून चंद्रिका चुडासमा आणि गौरव पांडय़ा यांनी निवडणूक लढवली. ‘माझ्या आत्म्याचा आवाज ऐकून देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणाऱ्या नेतृत्वालाही मी मतदान केले. अशी प्रतिक्रीया अल्पेश ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यावर व्यक्त केली.



























































