सातपुडय़ाचे मध थेट दुबई, सिंगापुरात, आदिवासींच्या जीवनात गोडवा आणण्याचा भावेश वानखेडेचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावतीचा भावेश वानखेडे याने अडीच वर्षांपूर्वी वडिलांच्या सल्ल्यानुसार सातपुडय़ाच्या आदिवासी, शेतकऱयांसोबत काम करायला सुरुवात केली. आदिवासींनी तयार केलेले जंगली मध त्याने थेट दुबई, सिंगापुरात पोचवले. मधच नव्हे तर गाईचे तूप आणि हळदीची पावडर यांचाही ब्रँड तयार केला. भावेश वानखेडेची ‘ट्राईब ग्रोन’ कंपनी 1200 हून अधिक आदिवासींचे नेटवर्क उभं करू पाहतेय.

भावेशने ‘ट्राईब ग्रोन’ ही पंपनी रजिस्टर करून जंगली मध, देशी गाईचे तूप आणि हळद पावडर या तीन उत्पादनांवर लक्ष केंद्रित केलंय. सातपुडा पर्वतरांग हे भावेशचे कार्यक्षेत्र बनलेय. त्याने तिथल्या आदिवासांना उत्पादने कशी घ्यायची, मार्पेटिंगच्या संधी, ब्रँडिंगची माहिती तसेच प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. गोंड आणि कोरकू लोक त्याच्या प्रोजेक्टशी जोडले गेले. महाराष्ट्रातील नव्हे तर मध्य प्रदेशातील आदिवासी पट्टय़ातही तो काम करत आहे.

भूषण सांगतो, आदिवासी बांधव शेती खूप जुन्या पद्धतीने करतात. त्यामुळे जास्त उत्पादने निघत नाही. आम्ही त्यांना उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करतो. आदिवासींची उत्पादने आम्ही ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय विकायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा लाभ थेट आदिवासींना मिळतोय. त्यांची कमाई पूर्वीपेक्षा तिप्पट झाली.

संरक्षणासाठी घाला सूट

आदिवासी जुन्या पद्धतीने शेती करतात. त्यामुळे बदल स्वीकारणे आव्हानात्मक होते. ते मधाचं पोळं सगळं जाळून मध काढायचे. आम्ही त्यांना पोळं किती कापायला पाहिजे, बाकीचे पोळं मधमाशांसाठी कसं ठेवून द्यायला पाहिजे या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यामुळे पोळ्यातून अधिकाधिक मध निघू लागलं, असे भावेश म्हणाला.

n ‘ट्राईब ग्रोन’ रिटेल ब्रॅण्डची उत्पादने सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विकली जातात. देशातील 70-80 ऑर्गेनिक स्टोअरमध्येही मिळतात. अॅमेझॉन आणि वेबसाईटवर ऑनलाइन विक्री लवकरच सुरू होणार आहे. ‘ट्राईब ग्रोन’सोबत सध्या 236 आदिवासी आहेत. अजून पाच-सहा प्रोडक्टवर काम सुरू होणार आहे. त्यासाठी 1200 आदिवासी शेतकरी इच्छुक आहेत. उत्पादनांना सिंगापूर, दुबई येथेही मागणी आहे. ‘ट्राईब ग्रोन’शी जोडण्यासाठी संपर्क 8390131411.

वडिलांची संकल्पना नेतोय पुढे

भावेशने मुंबईत टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्समधून शिक्षण पूर्ण केले. सोशल आंत्रप्रीनरशीप केले. भावेश सांगतो, विदर्भातील शेतकऱयांच्या आत्महत्या बघता मला शाश्वत शेतीमध्ये काही तरी करायचे होते. माझ्या वडिलांचा औषधांचा व्यवसाय होता. त्यांना लोकांमध्ये जाऊन काम करायला आवडायचे. मी पण तेच करावं, अशी त्यांची इच्छा होती. ‘ट्राईब ग्रोन’ची आयडियादेखील त्यांचीच. ही पंपनी सुरू केली आणि आठवडाभरात वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांची संकल्पना मी पुढे नेतो.