23 जूनला सुरू होणार अमरनाथ यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोट्यवधी हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला 23 जूनपासून सुरुवात होणार आहे. श्री अमरनाथ यात्रा श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल व श्री अमरनाथ यात्रा बोर्डाचे अध्यक्ष गिरीश चंद्र मुमरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 23 जूनला सुरू होणाऱी ही यात्रा 3 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतरची ही पहिलीच अमरनाथ यात्रा आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा या यात्रेच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याचे समजते. गेल्या वर्षी जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा अर्धवट रोखण्यात आली होती.