ट्रेंड – कपडे वाळवण्याचा अजब जुगाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कपडे धुतल्यानंतर ते वाळवणे पावसाळ्याच्या दिवसांत मोठे आव्हान असते. जर तुम्ही एकाच वेळी खूप कपडे धुतले असतील तर? इंस्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाने कपडे वाळवण्यासाठी एक भन्नाट जुगाड केला आहे. हा तरुण प्रत्येक पाइपाच्या दोन्ही टोकांना आणि मध्यभागी तीन दोऱ्या बांधतो त्यानंतर तीन दोऱ्यांनी जोडलेला एक पाइप छताच्या रेलिंगभोवती गुंडाळतो आणि तो लटकवतो. दुसरा पाइप छताच्या दुसऱ्या बाजूला ओढतो. तो पाइपसुद्धा रेलिंगला जोडतो. यामुळे दोन्ही पाइपाला बांधलेल्या तीन दोऱ्यांवर कपडे वाळवण्यासाठी जागा तयार होते. ‘भावाचे टॅलेंट अजब आहे.’ अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. @tailent_boy1 या इन्स्टा हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका नेटीझनने लिहिले की, जेव्हा छतावर रेलिंग आहे, तर त्यावर दोरी ओढून कपडे वाळवण्याची काय गरज आहे? दुसऱ्या एकाने लिहिले की ही एक उत्तम कल्पना आहे असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.