बाप झाला आई; केले बाळाला स्तनपान, इंटरनेटवर फोटो व्हायरल

145

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

बाळाला स्तनपान हे नेहमी आईच करते, मात्र अमेरिकेत एका पुरुषाचे त्याच्या बाळाला स्तनपान करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. सुरुवातीला लोकांनी हे फोटोंवरून त्याची टेर खेचली. मात्र नंतर लोकांना त्या बापाच्याा निर्णया मागचे खरे कारण समजले त्यानंतर त्याचे आता कौतुक केले जात आहे. या बापाने खोट्या निप्पलमध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने दूध भरून ते निप्पल त्याच्या छातीला चिकटवले असून त्याद्वारे तो त्याच्या बाळाला दूध पाजत आहे.

अमेरिकेतील विसकॉसिन भागात राहणाऱ्या मॅक्समिलिअन न्युब्युर व एप्रिल न्युब्युर या दाम्पत्याला काही दिवसांपूर्वीच मुलगी झाली. एप्रिलची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली होती. मात्र सिझेरियन करताना काही अडचणी आल्याने एप्रिलला आकडी येऊ लागल्या. त्यामुळे एप्रिलला मुलीला दूध पाजणे शक्य नव्हते. मात्र मुलीला जितकी आईच्या दुधाची जितकी गरज आहे तितकीच आईच्या शरीरातून मिळणाऱ्या उबेची देखील असे डॉक्टरांनी मॅक्समिलिअनला सांगितले. यावर तोडगा म्हणून मॅक्समिलिअनेच मुलीला छातीला कवटाळून दूध पाजण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी मॅक्सला खोटे निप्पल दिले असून ते तो त्याच्या स्तनांवर चिकटवून त्यातून मुलीला दूध पाजत आहे. मॅक्सने त्याच्या सोशल मीडियावरून मुलीला दूध पाजतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्याचे ते फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या