
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला एक महिना उरला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल बऱ्यावाईट बातम्याही येत आहेत. ट्रम्प यांनी मात्र आपल्यावर औषधांचा चांगला परिणाम होत असल्याचे म्हटले असून ‘मी पुन्हा येईन’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मेरिलँड येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी त्यांची प्रकृती खराब होती पण आता त्यांना ताप नसून ऑक्सीजन लेव्हलही वाढत आहे असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले.





























































