
सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सध्या अमेरिकेच्या दौऱयावर आहेत. वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगी यांची 2018 साली सौदी एजंट्सनी केलेल्या हत्येनंतर त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सात वर्षांनंतर अमेरिकेत आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे शाही स्वागत केले. रेड कार्पेट, मिलिट्री बँड बाजा, फायटर जेट्सचे फ्लायपास्ट आणि ईस्ट रुममध्ये भव्य डिनरचे आयोजन करण्यात आले. सौदीच्या क्राऊन प्रिन्सच्या दौऱ्यामुळे ट्रम्प चांगलेच खूश आहेत. त्यांनी पत्रकार जमाल खगोशी हत्येप्रकरणी क्राऊन प्रिन्सला क्लीन चिट दिली. क्राऊन प्रिन्सला याबाबत काही माहीत नव्हते. त्यामुळे असे मुद्दे उपस्थित का करायचे, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प-क्राऊन प्रिन्सच्या भेटीत दोन्ही देशांनी अनेक मोठय़ा संरक्षण आणि आर्थिक करारांवर शिक्कामोर्तब केले. एफ 35 फायटर जेट्सचा विक्री करार हे आजच्या भेटीचे प्रमुख आकर्षण राहिले. अमेरिकेकडून 300 रणगाडय़ांची खरेदी, सिव्हिलियन न्यूक्लीअर डिल अशा मुद्दय़ांवर चर्चा झाली.





























































