दहा वर्षांत महाराष्ट्राला दिले 16 लाख कोटी, शहांनी मांडला आकडय़ांचा बाजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात काँग्रेसची सत्ता असताना दहा वर्षांत महाराष्ट्राला केवळ 1 लाख 91 हजार कोटीचा निधी मिळाला. मात्र त्यानंतर पेंद्रात आलेल्या भाजपच्या मोदी सरकारने दहा वर्षाच्या काळात महाराष्ट्राला 16 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच महाराष्ट्राचा विकास दिसून येत आहे. तिसऱयांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपला पुन्हा एकदा संधी द्यावी, छत्रपती संभाजीनगरमधून कमळाला निवडूण आणा असे आवाहन करीत पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आकडय़ांचा बाजार मांडला.

शहा यांचे भाषण सुरू होताच लोक उठले
सभेसाठी आणण्यात आलेल्या लोकांनी अमित शहा यांचे भाषण सुरू होताच सभास्थळावरून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. अनेकजण उठून जात असल्याचे पाहताच शहा यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. तुम्ही पुन्हा भाजपला निवडूण देणार की नाही, छत्रपती संभाजीनगरमधून कमळ निवडूण आणणार की नाही, तिसऱयांदा मोदी यांना पंतप्रधान करणार की नाही असा सवाल करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.