राम मंदिराच्या निर्मितीत काँग्रेसचा खोडा, भाजपध्यक्ष अमित शाहांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद सुरू झालेली आहे. या परिषदेत भाजप अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुध्दा उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या भाषणात अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राम मंदिराची निर्मिती व्हावी ही भाजपची इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयातही लवकरात लवकर सुनवाई व्हावी परंतु या सगळ्यात काँग्रेस पक्ष खोडा टाकत आहे असे अमित शाह यांनी म्हटले.

शाह म्हणाले की, “आसाम मध्ये सर्वानंद सोनोवाल यांचे सरकार स्थापन झाल्यावर एनआरसीची सुरूवात झाली. एनआरसी ही देशातील घुसखोराखांना ओळखण्याची व्यवस्था आहे.” एकट्या आसाममध्ये ४० लाख घुसखोर असल्याचे स्पष्ट झाल्याचेही त्यांनी म्हटले.

स्वच्छता अभियानाबाबत शाह म्हणाले की, “गांधीजींनंतर स्वच्छता हा फक्त नारा होता, मोदींनी त्याचे रुपांतर एका अभियानात केले. आज देश स्वच्छ होण्यात अग्रेसर आहे.