अमरावती हत्याकांड, 7 मारेक-यांना 5 ऑगस्टपर्यंत कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
एनआयए कोर्टाने आज अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे हत्याकांडातील 7 आरोपींची न्यायालयीन कोठडी 5 ऑगस्टपर्यंत वाढवली. एनआयए कोर्टाने 15 जुलैला सात आरोपींना 22 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज त्यात 14 दिवसांची वाढ करण्यात आली. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेली आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ कोल्हे यांनी पोस्ट केला होता. त्यातून कोल्हे यांची 21 जूनला गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती.