अमरावतीत कोरोनाचे नवे 28 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 5620वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

अमरावती जिल्ह्यात रविवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 152 झाली असताना सोमवार दुपारपर्यंत आलेल्या अहवालानुसार 28 नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळुन आले असून कोरोनाबाधितांची संख्या आता 5 हजार 620 वर पोहचली आहे.

अलीकडच्या काही दिवसापासून कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळुन येत आहे. आज आलेल्या 28 कोरोनाबाधितांपैकी 20 कोरोनाबाधित ग्रामीणमधले आहे. यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील वेगवेगळ्या गावात 6 कोरोनाबाधित आढळुन आले आहे. विरुळ रोंघे येथील 3 तर तिवसा, जळगाव आर्वी, धामणगाव रेल्वे येथील एक कोरोनाबाधित आढळुन आला आहे. तसेच अचलपूर तालुक्यातील सुध्दा हीच परिस्थिती आहे. या तालुक्यातील गावापैकी काकडा गावातील तर इसलामपूर वडनेर येथे प्रत्येकी एक रुग्ण नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकाला कोरोना झाला असून चांदूरबाजार तालुक्यात ब्राम्हणवाडा थडी येथील एक तर नांदगाव पेठ येथे २ रुग्ण आढळुन आले आहे. एकुण रुग्णांपैकी 10 रुग्ण अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागातील आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 128 जणांना मृत्यू झाला असून सध्या 1313 रुग्ण उपचारार्थ दाखल आहे. यापैकी 999 रुग्ण अमरावतीच्या कोविड रुग्णालयात तर 17 रुग्ण नागपूर रुग्णालयात भर्ती आहे. यासोबत गृहविलगीकरणात 297 रुग्ण असून आतापर्यंत 4151 रुग्णांना उपचारार्थ सुट्टी देण्यात आली आहे.