शबनमची फाशी टळली

प्रियकराला सोबत घेऊन आपल्याच कुटुंबातील 7 जणांची निर्घृण हत्या करणारी उत्तर प्रदेशातील दोषी महिला शबनमची फाशी तूर्त टळली आहे. तिने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे दया याचिका केली आहे. याचिकेवर राज्यपालांनी निर्णय दिल्यानंतरच शबनमच्या फाशीबाबत डेथ वॉरंट जारी केला जाणार आहे.

देशात पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला फाशी दिली जाणार आहे. शबनमने वकिलांमार्फत जेलरकडे दया याचिकेसाठी अर्ज केला होता. हा अर्ज पुढे राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे दया याचिकेवर निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत शबनमच्या फाशीसाठी डेथ वॉरंट जारी केले जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद शबनमच्या वकिलांनी मंगळवारी अमरोहा न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने डेथ वॉरंट जारी करण्याचा निर्णय पुढे ढकलला. याआधी राष्ट्रपतींनी शबनमची दया याचिका फेटाळलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या