
उर्फी जावेद हिच्या अंगप्रदर्शनाविरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यावरून उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला असून उर्फी विविध प्रकारे चित्रा वाघ यांना डिवचण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीए. एकीकडे भाजप नेत्या उर्फी विरोधात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र उर्फीचे समर्थन केलं आहे.
मुंबई येथे पत्रकारांनी उर्फी जावेद हिच्या बाबत अमृता फडणवीस म्हणाल्या, ”एक महिला म्हणून उर्फी जे काही करत आहे त्यात मला काहीही चुकीचे वाटत नाही. जे काही ती करतेय ती तिच्यासाठी करतेय. प्रत्येकाला स्वत:चे मत आहे. ” असे त्या म्हणाल्या.
तसेच ”चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की जर जर एखाद्या भूमिकेसाठी किंवा व्यावसायिक गरज म्हणून तुम्ही तसे कपडे घातले तर ठीक पण सार्वजनिक ठिकाणी तुम्ही येताना तुम्ही आपली संस्कृतीचा विचार करायला हवा असं त्यांना वाटतं. चित्रा वाघ यांचे ते मत आहे. त्यानुसार त्यांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे’, असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.






























































