बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या वैयक्तित आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली. अलिकडेच तिची ‘कॉल मी बे’ वेब सीरिज देखील प्रचंड गाजली. त्यामुळे अभिनेत्रीचे प्रोफशनल आणि वैयक्तिक आयुष्य सध्या प्रकाश झोतात आहे. अशातच अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. अनन्या पांडेला एका गंभीर आजाराचं निदान झालं आहे.
अभिनेत्री अनन्या पांडेला इम्पोस्टर सिंड्रोम नावाचा आजार झाला आहे. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत अनन्याने या आजाराबाबत खुलासा केला. ‘माझा इम्पोस्टर सिंड्रोम काही साध्या गोष्टींपासून सुरू होतो, जसे कोणी माझे नाव घेते. तेव्हा मी पूर्णपणे वेगळं व्यक्तिमत्व असते. मुलाखती आणि इतर वेळी कुणी माझं नाव घेतलं, तर मला कधीकधी असं वाटतं की, माझं नाव माझं नाही. मला एका तिसऱ्या व्यक्तीसारखे वाटतं. जेव्हा मी स्वतःला बिलबोर्डवर पाहते, तेव्हा मला असं वाटत नाही की, मी स्वत:ला पाहतेय, किवां मी माझेच चित्रपट पाहते. पडद्यावर मी स्वत:च आहे, हे मी विसरून जाते. असे ती म्हणाली.
“मला सतत माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून मी करत असलेल्या गोष्टींबद्दल प्रमाणीकरण हवं असतं. विशेषत: चित्रपटाच्या सेटवर, कारण मी स्वतःवर खूप कठोर असते. जरी दिग्दर्शकाला माझं काम आवडले असेल तरीही, मी माझा शॉट पाहून आनंदी होत नाही. मी माझ्या कामावर खूश नसते, असंही अनन्या यावेळी म्हणाली.
बॉलिूवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने 2019 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या तिच्या पहिल्या चित्रपटातून तिने लोकांच्या मनात तिच अस्थित्व निर्माण केलं. अनन्या सध्या चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये झळकत आहे. तिच्या ‘कॉल मी बे’ ही वेब सीरीजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता ती लवकरच CTRL या चित्रपटात दिसणार आहे.