पीओपीची सीट डोक्यावर पडून कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत असताना सातव्या मजल्यावरून पीओपीची सीट डोक्यावर पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साहिल राजभर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

साहिल हा अंधेरी पूर्व परिसरात राहत होता. तो त्याच्या वडिलांसोबत एका कंपनीत काम करत होता. त्या कंपनीला अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये पीओपी आणि लाईट बसवण्याचे कंत्राट मिळाले आहे. बुधवारी सकाळी साहिल हा त्याच्या वडिलांसोबत हॉटेलमध्ये आला. सातव्या मजल्यावरील छताच्या दुरुस्तीचे काम साहिल करत होता. काम करत असताना पीओपीसाठी बसवलेली सीट साहिलच्या डोक्यात पडली.

सीट डोक्यात पडल्याने साहिल हा जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी गेले. साहिलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद केला.