आंध्र प्रदेशात दिशा विधेयक 2019 मंजूर; 21 दिवसात होणार बलात्काऱ्यांना शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याच्या घटनेनंतर देशभरात निदर्शने झाली होती. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. यानंतर लोकांनी बलात्काराच्या आरोपींना त्वरित कठोर शिक्षा देण्यासाठी नवीन कायदा करण्याची मागणी केली होती. अशातच आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक 2019 विधानसभेत मंजूर केला आहे. या विधेयकात बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा आणि बलात्कार प्रकरणी 21 दिवसांत सुनावणी पूर्ण करून आरोपींना शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तत्पूर्वी, गुरुवारी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक मांडण्यात आले होते. ज्याला संपूर्ण मंत्रिमंडळाने एक मताने मंजुरी दिली होती. यानंतर हे विधेयक शुक्रवारी आंध्र प्रदेश विधानसभेत मांडले असता ते मंजूर करण्यात आले आहे.