
अंगडीया खंडणी प्रकरणात पाहिजे आरोपी असलेल्या उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या अटकपुर्व जामिन अर्जावर आज युक्तीवाद पुर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आता सोमवारी त्रिपाठी यांच्या जामिन अर्जावर सुनावणी होईल.
अंगडीया खंडणी प्रकरणात उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनाही आरोपी दाखविण्यात आले आहे. गुन्हे शाखेची पथके त्रिपाठींचा शोध घेत आहेत. परंतू अटक टाळण्यासाठी त्रिपाठी यांनी अटक पुर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज सुनावणी होणार होती. परंतु त्रिपाठी यांच्या अटकपुर्व जामिन अर्जावर आज युक्तीवाद पुर्ण होऊ शकला नाही. त्रिपाठी यांचे वकिल अनिकेत निकम यांना युक्तीवाद वेळेअभावी पुर्ण करता आला नाही.परिणामी न्यायालयाने त्रिपाठी यांच्या जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी ठेवली आहे.

























































