चीनच्या युन्नान प्रांतात एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या लग्नात तरुणींचा जमाव लग्नमंडपाबाहेर धरणे धरल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणींनी तरुणाला माजी प्रियकर म्हणत लग्न थांबवण्याची धमकी दिली. त्यांच्या मते लग्न करण्याचे वचन दिले होते पण शेवटच्या क्षणी त्याने नकार दिला आणि आता दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे.
या घटनेचा व्हिडिओ चिनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुलींना लग्नमंडपाबाहेर विरोध करताना दिसत आहे. त्या तरुणी बॅनर आणि पोस्टर घेऊन निषेध करत होत्या. एवढेच नाही तर तरुणाला आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकीही दिली. लग्नात बराच वेळ गोंधळ सुरू होता. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चेन नावाच्या तरुणाचे 6 फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते. सर्व तयारी झाली होती. दरम्यान, मुलींचा एक जमाव लग्न मंडपाबाहेर धरणे धरून बसला. त्यांच्या हातात बॅनर होते, त्यावर लिहिले होते की, आम्ही चेनच्या माजी प्रेयसी आहोत, हे लग्न होऊ शकत नाही. मुलींनी सांगितले की, जर हे लग्न झाले तर ते सर्व काही नष्ट करतील.
आंदोलन पाहताच मोठ्या संख्येने लोक तेथे जमा झाले. वधू-वरांच्या कुटुंबीयांनाही आश्चर्य वाटले. याबाबत चेनने मीडियाशी बोलताना सांगितले की, या घटनेने तो शरमल्यासारखा झाला. बायकोही निघून गेली. ती बोलतही नाहीये. मात्र, चेनने आपल्या अनेक प्रेयसी असल्याचे मान्य केले आहे. पण त्या सगळ्यांना तो नाही म्हणाला होता. आता त्याला नवीन आयुष्य सुरू करायचे आहे. चेनच्या मते त्याच्याकडून चुका झाल्या. त्याने मुलींनाही त्रास दिला. पण हा सगळा माझा भूतकाळ असल्याचे त्याने सांगितले.


























































