दोन अनिल कपूर एकत्र आले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अनिल कपूर आणि त्याची ‘टोटल धमाल’ या चित्रपटातील सहकलाकार माधुरी दीक्षित हे दोघे सुपर डान्सर  3 च्या सेटवर भेटण्यासाठी येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी अनिल कपूरला आश्चर्यचकित करण्यासाठी हुबेहूब त्याच्यासारखा दिसणार्‍या एका माणसाला मंचावर आणलं होतं. त्या माणसाने स्टेजवर एकदम डॅशिंग एंट्री घेतली आणि अनिलच्या ‘ए जी ओ जी’ या गाण्यावर त्याच्या वैशिष्टय़पूर्ण हालचालींसह नृत्य केले. त्यानंतर अनिलने त्याला स्टेजवर साथही केली. अनिल त्याचं नृत्य बघून खूपच प्रभावित झाला. त्याला भेटल्यानंतर अनिल कपूर म्हणाले, ‘मला खूप धन्य वाटतंय की माझ्यामुळे तुला एवढे शोज मिळत आहेत आणि ते तुमच्या उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचं आहे. तू 3000 पेक्षा जास्त शोज केले आहेस आणि त्याचा मला अतिशय अभिमान वाटतो. मी स्वतःसुद्धा एवढे शोज केले नाहीयेत आणि आता मला याच्या दुप्पट म्हणजे 6000 शोज करावेसे वाटतायंत.’