मोदी ‘आश्वासनबाज’ पंतप्रधान, अण्णांचा थेट हल्ला

22
anna-hazare

सामना ऑनलाईन । राळेगणसिद्धी

सत्तेत येण्या अगोदरपासून या पंतप्रधान मोदींकडून अनेक आश्वासनं देण्यात आली. पण ती पाळली गेली नाहीत. इतकी आश्वासनं यांनी दिली की या पंतप्रधानांचे नाव ‘आश्वासनाबाज’ पंतप्रधान ठेवावे लागेल, असा थेट हल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. समाजाचा प्रमुख म्हणून त्यांच्या पुढे चालणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी वाढते. मात्र हे पंतप्रधान सगळं विसरले आहेत, असंही अण्णा म्हणाले. राळेगणसिद्धी या आपल्या गावातून त्यांनी सरकारविरोधात उपोषणास सुरुवात केली आहे. त्याआधी बोलताना त्यांनी मोदी सरकार तोफ डागली.

ही एक-दोन महिन्यात मिळालेली आश्वासन नाहीत. मला तर कधी कधी असं वाटतं की हे पंतप्रधान आणि त्यांच्या लोकांनी जी आश्वासनं दिली ती त्यांना तरी माहीत आहेत का? इतकी आश्वासन दिले आणि आता त्याचे पालन करत नाहीत, असं अण्णा हजारे म्हणाले. शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे, त्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू अशी आश्वासनं दिली होती. मात्र आश्वासन पाळले नाही, असं उदाहरण अण्णांनी यावेळी दिलं.

महाराष्ट्र सरकारने लोकायुक्ताला मंत्रिमंडळात मंजुरी दिली आहे. ठीक आहे, पण शेतकऱ्यांचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. लोकपाल नियुक्ती केंद्राच्या अखत्यारित आहे. नरेंद्र मोदी सरकारने हे केले पाहिजे. त्यासाठी गिरीश महाजन काय करतील. 23 मार्च रोजी हेच मुख्यमंत्री फडवीस, गिरीश महाजन आले. लिखीत आश्वास दिले पण पुढे काही झाले नाही. नऊ महिने झाले. मोदींनी फटाफट आदेश दिले पाहिजे, पण तसे काहीच होत नाही, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या