अण्णांना मोदी सरकारनं फसवलं, पुन्हा आंदोलनाचा इशारा

36

सामना प्रतिनिधी । राळेगणसिद्धी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पंतप्रधान कार्यालयाला स्मरण पत्र पाठवले असून दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्यास २ ऑक्टोबर पासून आंदोलनचा इशारा देण्यात आला आहे.

सत्तेत आल्यावर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट जास्त दर, त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त लागू करण्याची घोषणा मोदींनी निवडणुकीच्या पूर्वी केली होती. या संदर्भात अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र व्यवहार केला. मात्र काहीच उत्तर देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी शहीद दिनी दिल्लीत आंदोलनही केलं, मात्र सरकारनं आंदोलकांच्या रेल्वे आणि गाड्या रोखून धरल्या, मात्र सातव्या दिवशी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी पुन्हा काही आश्वासनं दिली.

कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता, शेतमालाला साठवण्यासाठी शीतगृह, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, लोकपाल आणि लोकायुक्तसह अनेक आश्वासन दिलं होतं.

मात्र उपोषण सोडल्यावर दोन वेळा पुन्हा पत्र व्यवहार केला. आता तिसरं पत्र पाठवत असून मागण्या मान्य न झाल्यास राळेगणला २ ऑक्टोबरपासून आंदोलनचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या