
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या संरक्षणात वाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला असताना अण्णा हजारे यांनी मात्र आपले संरक्षणच काढून घेण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी पाठविले आहे.
आपणास देण्यात आलेल्या संरक्षणावर मोठा खर्च होतो. जनतेचा पैसा आपल्या संरक्षणावर खर्च होऊ नये म्हणून हे संरक्षण काढून घेण्यात यावे. माझे काही बरेवाईट झाले तरी त्याला मीच जबाबदार राहीन असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षेसंबंधीच्या विविध मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी १० डिसेंबरपासून मौनव्रत सुरू केले आहे. हे व्रत सुरू असतानाच अण्णांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठविले आहे.





























































