पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड, सिंधमध्ये उरली अवघी 20 मंदिरं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. रविवारी सकाळी सिंध प्रांतातील एका हिंदु मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानातील सिंध प्रांतात आता 428 पैकी अवघी 20 मंदीरं उरली आहेत. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा नया पाकिस्तानचा दावा फोल ठरवणारी आहे.

लंडनमधील पाकिस्तानी मानवी हक्क कार्यकर्ते अनिला गुलजार यांनी ही माहिती दिली आहे. ‘सिंध प्रांतातील बादीन भागातील कोरीओ घनवार गावातील एका हिंदु मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात सिंध प्रांतातील अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून आता 428 मंदिरांपैकी अवघी 20 मंदिरं उरली आहेत.’, असे गुलजार यांनी सांगितले.

जानेवारी महिन्यात पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदू मंदिरावर हल्ला करून मंदिराचे नुकसान करण्यात आले. तसेच मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर तेथील ग्रंथाचेही नुकसान करण्यात आले. त्याआधी सिंध प्रांतात हिंदू आणि शीख तरुणींचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या अनेक घटना उघड झाल्या होत्या.