
येत्या सोमवारपासून अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य प्रवेशासाठी आणखी एक विशेष फेरी राबविली जाण्याची शक्यता आहे. याविषयीच्या अधिपृत सूचना लवकरच अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर केल्या जाणार आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली आहे. या शहरांमध्ये अद्याप अकरावीच्या जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत. त्याचबरोबर सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून त्यांची प्रवेशासाठी विचारणा सुरू आहे. प्रवेशाला सुरुवात झाल्यास आणखी अर्ज वाढण्याची शक्यता शिक्षण विभागातून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा प्रवेशफेरी घेतली जाणार आहे. 30 ऑक्टोबरला अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया संपल्याचे माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले होते. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी तीन नियमित फेऱया, एक विशेष फेरी आणि प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी पार पडली. एपूण 5 लाख 35 हजार 710 जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यापैकी 3 लाख 64 हजार 134 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले असून अद्याप एक लाख 71 हजार 576 जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेशाची मागणी करणाऱया विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश फेरी राबविली जाणार आहे.


























































