
प्रसिद्ध तालवादक अनुपम घटक यांच्या तालवादनाची जादू अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. येत्या 24 सप्टेंबर रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात रात्री 8.45 वाजता ‘बॉलिवूड रिदम विथ अनुपम घटक’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या रिदमची गाणी ऐकता येतील.
बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये देशी ठेका असतो. त्यासोबतच जॅझ ते डिस्को, हिप हॉप या पाश्चात्य शैलीतला रिदमही असतो. त्याची झलक या कार्यक्रमात अनुभवता येईल. अशी भिन्न रिदमची गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत. गायक आलोक काटदरे, शैलजा सुब्रमणियन, मोना कामत हा कार्यक्रम सादर करतील.
अनुपम घटक या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहेत. त्यांनी देश-विदेशांत पाच हजारांहून अधिक स्टेज शो केलेले आहे. तालवादक म्हणून त्यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, कविता कृष्णमूर्ती, गायक शंकर महादेवन, उदीत नारायण, ए.आर. रहमान अशा अनेक दिग्गजांना साथसंगत केलेली आहे.



























































