
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यानां वर्सेोका पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. गुरुवारी कश्यप यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. तसेच तिने मदतीसाठी पंतप्रधानांनादेखील एक ट्विट केले होते. त्यानंतर पायलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीदेखील भेट घेतली होती. पायलने कश्यप याच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी केली होती.


























































