अनुष्का- विराटच्या दुसऱ्या बाळाचा जन्म लंडनमध्ये होणार? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
virat-anushka first good news

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपासून  दोघांच्या दुसऱ्या बाळाची चर्चा सुरु होती. अभिनेत्रीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबाबत सातत्याने बातम्या येत होत्या. मात्र अद्याप या जोडप्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अशात आता सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चित्रपटसृष्टीत चर्चांना उधाण आलं आहे. कारण या पोस्टमध्ये हे जोडपे त्याच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत देशात नव्हे तर परदेशात करणार असल्याचे लिहिले आहे.

दरम्यान उद्योगपती हर्ष गोएंका यांनी अनुष्का शर्मा हिच्या प्रेग्नेंसीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हर्ष गोएंका यांनी नुकतेच त्याच्या X अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘अवघ्या काही दिवसात बाळाचा जन्म होणार आहे. आता तो वडिलांसारखा क्रिकेटर बनतो की आईप्रमाणे चित्रपटांमध्ये करिअर करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे . यासोबतच मुलाचा जन्म लंडनमध्ये होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हर्ष गोएंका यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 2020 मध्ये विराट कोहलीने अनुष्काच्या पहिल्या गरोदरपणाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. जानेवारी 2021 मध्ये अनुष्काने त्यांच्या मुलीला जन्म दिला.मात्र, या जोडप्याने अद्याप मीडियासमोर मुलीचा चेहरा उघड केलेला नाही. दोघांनाही त्यांचे वैयक्तिक आयुष्य अगदी खाजगी ठेवायचे आहे.

अनुष्का शर्मा लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. अनुष्काने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.