World Cup 2023: अनुष्काने विराटसाठी आनंद व्यक्त करत शेअर केली खास पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये रविवारी हिंदुस्थानने विजयाची मोहोर उमटवली आहे.  ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केल्यानंतर हिंदुस्थानात जल्लोषाचे वातावरण आहे. या सगळ्यात विराट कोहलीने चमकदार कामगिरी केल्याने क्रिकेटचे चाहते विराटवर प्रचंड खूश आहेत. अशातच त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही विजयाची खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

अनुष्का शर्माने सोशल मीडियावर खास अंदाजात आपला आनंद व्यक्त केला आहे. अनुष्काने आयसीसीची एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये विराट कोहली आणि के.एल.राहुल यांच्या फोटोमध्ये निळ्या रंगाच्या बदामाचा इमोजी दिला आहे. अनुष्कासोबत संपूर्ण देश हिंदुस्थानी टीमच्या विजयाचे जल्लोष साजरा करत आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण विराट कोहली आणि टीमचे अभिनंदन करत आहेत.