चितापाठोपाठ हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरचेही इमर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी हवाईदलाचे चिता हेलिकॉप्टर गुरुवारी उत्तर प्रदेशाच्या एक्सप्रेसवेवर उतरण्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी लष्कराच्या अपाचे लढाऊ चॉपरला तांत्रिक बिघाडामुळे पंजाबच्या शेतात उतरवावे लागले. या इमर्जन्सी लॅण्डिंगमध्ये विमानाचे कोणतेही नुकसान झालेले नाही.शिवाय चॉपरचे दोन्ही पायलट सुखरूप असल्याचे वृत्त आहे.

अमेरीकेकडून हिंदुस्थानी लष्कराने खरेदी केलेले हायटेक अपाचे -ए एच 64 इ हे जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते.हवाई दलाच्या अपाचेने पठाणकोट हवाई तळावरून चाचणी उड्डाण केले होते.पण पंजाबच्या बुधावर गावाजवळ येताच विमानात हवेतच असताना तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले.आपत्कालीन स्थितीत हे चॉपर अखेर गावातील शेतात उतरविण्यात आले.चॉपरचे पायलट फ्लाईट लेफ्टनंट अनुप आणि फ्लाईट लेफ्टनंट रजत हे दोघेही सुखरूप आहेत.