
उत्तर हिंदुस्थानात होणारा माकडांचा उच्छाद हा काही नवीन विषय नाही. उत्तर हिंदुस्थानातील अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये माकडांच्या टोळ्या नागरिकांना हैराण करतात. उत्तर प्रदेशमध्ये मात्र, या उच्छादावर एक इलाज शोधण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे माकडांच्या उच्छादावर एक जालीम युक्ती शोधून काढण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत उत्तर हिंदुस्थानात माकडांची संख्या वाढत आहे.
अनेक घरांच्या छपरांवर उड्या मारून त्यांना नुकसान पोहोचवणे, अन्नपदार्थांची नासधूस करणे, पर्यटनासाठी आलेल्या लोकांवर हल्ले करून त्यांच्या वस्तू पळवणे अशा अनेक पद्धतीने माकडांच्या टोळ्या दहशत माजवतात.
उत्तर भारत के हर शहर में बंदरों की संख्या लगातार बढ़ रही है, इसलिए कई क्षेत्रों में एक प्रयोग के रूप में लंगूर के कट-आउट लगाए गए हैं। जहां भी लंगूर हैं, बंदरों की उपस्थिति कम होती है-जिसे देखते हुए वन विभाग की टीम ने लंगूर के कट-आउट बनवाए हैं: राजेश कुमार, डीएफओ, मेरठ, UP pic.twitter.com/fkLCGtBSXK
— ANI_HindiNews (@AHindinews) April 1, 2022
त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता वन विभागाने वानरांचे कटआउट लावले आहेत. जिथे काळ्या रंगाचं तोंड असलेली वानरं असतात तिथे माकडांची संख्या कमी असते. त्यामुळे वनविभागाने ही युक्ती करून माकडांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयोग थोड्याफार प्रमाणात यशस्वी होत असल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे.




























































