उरणच्या एपीएम टर्मिनलमध्ये साडे तीन कोटींची अफरातफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरणच्या द्रोणागिरी नोडमध्ये असणाऱ्या ए पी एम टर्मिनल्स कंपनीमध्ये सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. बनावट दस्तऐवज सादर करून कंपनीला साडेतीन कोटी रुपयांना गंडा घालणारे आरोपी गुन्हा दाखल होऊन दोन महिन्याचा काळ उलटूनही अजून मोकाट असल्याने उरण पोलिसांच्या तपास यंत्रणेबाबत संशय व्यक्त होत आहे.

उरणच्या द्रोणागिरी विभागात एपीएम टर्मिनल हे जेएनपीटी बंदरातील मालाची हाताळणी करणारे महत्वाचे गोदाम आहे. या गोदामामध्ये कार्यरत असणाऱ्या शुभम क्लेअरिंग अँड फॉरवरडिंग एजन्सी बरोबर संगनमत करून आरोपी शहारुख फारुख शेख, यतीन कदम, रिझवान मुराद अली सोलकर, प्रणय गावंड, सुरज परमानंद नाखवा यांनी कंपनीला सिएचएद्वारे आलेल्या रोख व चेक द्वारे आलेल्या रक्कमेच्या पावत्यांमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी फेरफार करून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा अपहार केला आहे.

याबाबत एपीएम टर्मिनल्स कंपनीच्या फायनान्स विभागातील प्रकाश मधूकांत चंदेभमर यांनी उरण पोलीस ठाण्यात 11 डिसेंबर 2019 रोजी फिर्याद दाखल केली आहे. उरण पोलीस ठाण्यात भादंवि 408,465,467,468,477(अ)34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याला दोन महिने होऊनही सदर आरोपींना अटक करण्यास उरण पोलिसांना यश आले नाही. इतका मोठा घोटाळा होऊनही आरोपी मोकाट असतील तर उरण पोलीस करीत असलेल्य तपासाबद्दल संशय व्यक्त होत आहे