
ऍपल कंपनी पुढील महिन्यात आयफोन 17 सीरिज लाँच करणार आहे. या सीरिजसंबंधी आता नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आयफोन 17 सीरिजमधील फोनच्या फीचर्सनंतर आता या सीरिजमधील फोनच्या किमतीसुद्धा समोर येत आहेत. काही लीक रिपोर्टनुसार, आयफोन 17 बेस मॉडेलची किंमत 799 डॉलर म्हणजेच 69,566 रुपये असू शकते. या फोनमध्ये 6.3 इंचांचा स्क्रीन आणि नवीन ए19 चीप दिली जाणार आहे. आयफोन 17 एअरची किंमत 949 डॉलर म्हणजेच 82,627 रुपये आहे. या फोनमध्ये ए19 प्रो चिप, 12 जीबी रॅम मिळेल. आयफोन 17 प्रोची किंमत 1049 डॉलर म्हणजेच 91 हजार 333 रुपये, तर आयफोन प्रो मॅक्सची किंमत 1249 डॉलर म्हणजेच 1 लाख 8 हजार 747 असू शकते.