
Apple कंपनीने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G iPhone लॉन्च केला आहे. यासह कंपनीने iPhone 13 आणि iPhone 13 Pro चे नवीन कलर व्हेरिएंट देखील लॉन्च केले आहेत. कंपनीने iPhone SE 5G च्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, मात्र हा स्मार्टफोन आता 5G सपोर्टसह बाजारात उतरवण्यात आला आहे.
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये A15 Bionic चिपसेट दिली आहे. या चिपसेटमध्ये 6-core CPU, 4-core GPU आणि 16-core Neural Engine या गोष्टी मिळतात आणि लाईव्ह टेक्स्ट सारथे फिचर्सही इनेबल करता येतात. हा स्मार्टफोन कंपनीने iPhone SE 2020 च्या सक्सेसरच्या रुपात लॉन्च केला आहे. प्रोससरसह या स्मार्टफोनची बॅटरीही दमदार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अन्य कोणते फिचर्स आहेत हे जाणून घेऊयात.
Apple iPhone SE 5G ला कंपनीने जुन्या डिझाईनमध्येच लॉन्च केले आहे. या स्मार्टफोनमध्ये 4.7 इंचाचा Retina HD डिस्प्ले देण्यात आला असून फोनच्या फ्रंट आणि रिअर अशा दोन्ही बाजूने साईड प्रोटेक्टिव्ह ग्लास देण्यात आली आहे. कंपनीने iPhone 13 साठी जी प्रोटेक्टिव ग्लास वापरली होती तीच iPhone SE 5G मध्येही वापरली आहे.
कंपनीने या स्मार्टफोनसोबत 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला आहे. कॅमेऱ्यामध्ये mart HDR 4, Photographic Styles, Deep Fusion आणि पोर्टरेट मोड यासारखे फिचर्स युजर्सला मिळतात. iOS 15 सह हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला असून ग्राहकांसाठी Midnight, Starlight आणि Product RED अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. बॅटरी दमदार असली तरी बॉक्समध्ये चार्जर देण्यात आलेले नाही.
Apple iPhone SE 5G अमेरिकामध्ये 429 डॉलरला लॉन्च झाला आहे. 64 जीबी व्हेरिएंटची ही किंमत आहे. मात्र हिंदुस्थानमध्ये या स्मार्टफोनची किंमत थोडी जास्त आहे. हिंदुस्थानमध्ये हा स्मार्टफोन 43900 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. iPhone SE 2020 पेक्षाही या स्मार्टफोनची किंमत जास्त आहे. iPhone SE 2020 ची किंमत 42500 रुपये आहे. 11 मार्चपासून ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत.






























































