Apple चा मोठा निर्णय; जवळपास 600 कामगारांना कामावरून काढलं

कॅलिफोर्नियातील रोजगार विकास विभागाकडे दाखल केलेल्या माहितीनुसार, कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प थांबवण्याच्या निर्णयाचा एक भाग म्हणून कॅलिफोर्नियामधील 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया-आधारित कंपनीनं कामगार समायोजन आणि पुनर्प्रशिक्षण अधिसूचना किंवा WARN प्रोग्रामचे पालन करण्यासाठी राज्याकडे आठ स्वतंत्र अहवाल दाखल केले.

फेब्रुवारीच्या अखेरीस, Apple ने दोन्ही उपक्रम बंद करण्यास सुरुवात केली. अर्थात या घटनेकडे कंपनीचे तंत्रज्ञान पुढे नेण्यासाठी किंवा मोठ्या प्रमाणात नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याचे मोठे प्रयत्न म्हणून पाहिले गेलं. कार प्रकल्पाची दिशा आणि खर्चाच्या चिंतेबद्दल अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या शाशंकतेमुळे तो रद्द करण्यात आला. अभियांत्रिकी, पुरवठादार आणि खर्चाच्या आव्हानांमुळे हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अहवालानुसार, कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील Apple च्या मुख्य कार-संबंधित कार्यालयातून 371 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे. त्यासोबतच सॅटेलाइट कार्यालयातील डझनभर देखील कर्मचारी देखील प्रभावित झाले. सर्वांना काढून टाकण्याऐवजी शक्य असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा रोबोटिक्सवर काम करणाऱ्या टीम्समध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं आहे.

Apple च्या प्रवक्त्याने नोकरी कपातीमुळे प्रभावित कर्मचाऱ्यांच्या संख्येवर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला.

जारी केलल्या नोटिसमधून नोकरी कपातीची संपूर्ण व्याप्ती उघड होत नसल्यानं निश्चित संख्या अद्याप कळत नाही. Apple चे ऍरिझोनासह इतर क्षेत्रातील दोन्ही प्रकल्पांवर अनेक अभियंते होते अशी माहिती मिळते.