अयोध्या अभियानाला पाठींबा, बीड मध्ये महाआरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

श्रीराम मंदिर निर्माणसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या अयोध्या मोहिमेला पाठिंबा दर्शवण्यासाठी बीड मध्ये शिवसेनेच्या वतीने आज सायंकाळी ६ वाजता शहरातील कृष्ण मंदिर येथे महाआरती करण्यात आली व यावेळी श्री रामाचा गजर करण्यात आला.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत जगताप, बाळासाहेब अंबुरे, जिल्हासंघटक योगेश नवले, भाजपा शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे आणि शिवसैनिक उपस्थित होते.