अर्जुन खोतकर यांना विक्रमी मतांनी विजयी करा – रावसाहेब दानवे

मी केंद्रात मंत्री आहे, निवडणुकीनंतरराज्यमंत्री अर्जुन खोतकर कॅबिनेट मंत्री होणार आहेत. आम्ही दोघे मिळून आगामी काळात विकास कामांच्या माध्यमातून जालन्याचे नाव राज्यातच नव्हे तर देशपातळीवर उज्वल करू,अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. तथापि विकासाची तास अधिक गतिमान फिरवण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी केले.

जालना विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी 10 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोलापांगरी व रामनगर येथे झंझावाती प्रचंड अशा जाहीर सभा घेतल्या. या सभांना संपूर्ण परिसरातून जनसागर उसळला होता.

विधानसभा २०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार हे गरिबांचे सरकार असून काँग्रेसने 1972 साली गरिबी हटावचा नारा दिला होता, मात्र चाळीस वर्षानंतरही गरिबी हटली नाही. म्हणून संतप्त गरिबांनी काँग्रेसचे सुटा बुटातले सरकार उलथून टाकले व धोतर, टोपी आणि उपरणे वाल्यांचे सरकार आणले. मोदी सरकारने 2022 पर्यंत गरीबांना घरे देण्यासाठी योजना आखली असून ही घरे मिळत आहेत. या शिवाय या घरांत मोफत शौचालय, वीज व शंभर रुपयात गँसही दिला. ते पुढे म्हणाले की, मी व अर्जुन खोतकर खिलारी जोडी असून विकासाचे तास गतिमान करून जालन्याचे नाव देश व जागतिक पातळीवर नेण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनाच आपला साथीदार म्हणून निवडा व प्रचंड मताधिक्याने त्यांचा विजय करा, असे आवाहनही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

उरलीसुरली काँग्रेस मुळासकट उपटून फेका – खोतकर
काँग्रेसमुक्त देश असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊन स्वकर्तुत्वाने संपूर्ण देश मोदीमय केला आहे. देशातून काँग्रेस हद्दपार झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातून काँग्रेसचे उच्चाटन केले आहे. उरलीसुरली काँग्रेस या निवडणुकीत राऊंड अप मारुन मुळासकट उखडून फेका, असे आवाहन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी बोलताना केले.

आपली प्रतिक्रिया द्या