तेंडुलकर पिता-पुत्राचा शून्य योगायोग

51

सामना ऑनलाईन | मुंबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच सामन्यात आपले वडील विश्वविक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नको त्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिन आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला होता. योगायोग म्हणजे अर्जुननेही पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद होत बापाच्या नको त्या विक्रमाची बरोबरी केली.

सध्या श्रीलंका दौऱयावर असलेला अर्जुन तेंडुलकर ‘टीम इंडिया’च्या  १९ वर्षांखालील संघाकडून खेळतोय. या दौऱ्यातील चारदिवसीय दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची संघात निवड झालेली होती. अर्जुनने पहिल्याच सामन्यात आपला पहिला बळी मिळवला, पण त्या तुलनेची कामगिरी त्याला फलंदाजीत करता आली नाही. त्याला आपल्या पहिल्या डावात धावांचे खाते उघडता आले नाही. शाशिका दुलशान याच्या गोलंदाजीवर अर्जुन बाद झाला. ११ चेंडू खेळलेल्या अर्जुनला एकही धाव करता आली नाही. योगायोग म्हणजे पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात सचिनही शून्यावर बाद झाला होता, मात्र हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना नव्हता . त्याआधी सचिनने कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या