अर्जुनचे स्थान माझ्या मनात कायम खास राहील, आजही तो जवळचा आहे.. ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच मलायका अरोरा काय म्हणाली…

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप होऊन तब्बल दोन वर्षे उलटली. सध्याच्या घडीला ते एकमेकांसोबत फारसे दिसतही नाही. परंतु त्यांनी नात्यामध्ये बराच काळ एकमेकांसोबत घालवला. परंतु काही कारणास्तव या नात्याला पूर्णविराम देत त्यांनी आता नात्यात नाहीत. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना बॉलिवूडमधील स्टार कपल मानले जात असे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी बराच काळ एकत्र घालवला, पण एक वेळ अशी आली जेव्हा त्यांनी त्यांचे नाते संपवले आणि स्वतःचे मार्ग निवडले. आता, मलायका अरोराने या सर्व मुद्द्यांवर आणि तिचा माजी प्रियकर अर्जुन कपूरवर प्रतिक्रिया दिली आहे. मलायका अरोराने अलीकडेच ‘द नम्रता झकेरिया शो’ मध्ये तिचा माजी जोडीदार अर्जुन कपूरबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.

मलायका म्हणाली, अर्जुन आजही माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ” आपल्या प्रत्येकाला राग येतो, दुःख होते. पण हे सर्व आपल्या मानवी आयुष्याचा प्रमुख भाग आहे. मुख्य म्हणजे मानवी स्वभावानुसार आमच्या नात्यातही या गोष्टी आल्या. परंतु कालांतराने मात्र सर्व काही ठिक होते. वेळच सर्व जखमा भरून काढते.” मलायकाने असेही कबूल केले की अर्जुन तिच्यासाठी खूप खास आहे आणि तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ती म्हणाली, “काहीही झाले तरी तो माझ्यासाठी खूप खास आहे. मला आमच्या भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल जास्त बोलायचे नाही. मीडियामध्ये याबद्दल आधीच बरेच काही लिहिले गेले आहे.”

सध्याच्या घडीला मलायका एका मिस्स्ट्री मॅनसोबत वावरताना आणि फिरताना दिसत आहे. यावर तिला विचारल्यावर मात्र तिने या अफवा असल्याचे म्हटंले आहे. या सर्व गोष्टींचे खंडन करत ती म्हणाली, माझे अनेक मित्र मैत्रिणी आहे. मी जेव्हा कोणासोबत दिसते तेव्हा मला कायमच लक्ष्य केले जाते. मग ती जुनी मैत्रीण असो, समलिंगी मैत्रीण असो, विवाहित मैत्रीण असो किंवा व्यवस्थापक असो, तेव्हा लोक लगेचच लिंक-अपबद्दल बोलू लागतात. यावर हसतच मलायका म्हणाली, “लोकांना काहीही विषय असो फक्त त्यावर व्यक्त व्हायचे असते. मी कुणासोबत दिसल्यावर माझी आई देखील फोन करून विचारते, ‘बेबी हा नवीन कोण आहे?’ त्यामुळे या सर्व गोष्टींची मला आता सवय झालेली आहे. त्यामुळे मी या गोष्टींना फार किंमत देत नाही.