
जम्मू आणि कश्मीरमध्ये अनेक भागात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशातच जम्मू-कश्मीरच्या राजौरी येथे हिंदुस्थानी सैन्याने बचाव मोहिमेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत असून सैन्याच्या धाडसाला कडक सॅल्यूट ठोकण्यात येत आहे. लष्कराचे जवान एका मुलाला वाचवण्यासाठी थेट पुराच्या पाण्यात उतरल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
23 जुलै रोजी झालेल्या या रेस्क्यु ऑपरेशनचा हा व्हिडिओ आहे. यात नदीच्या मध्यभागी अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी लष्कराचे जवान हॅलिकॉप्टरची मदत घेत असल्याचे दिसते. यादरम्यान ते चक्क पुराच्या पाण्यात हॅलिकॉप्टर उतरवतात आणि मुलाला सुरक्षित बाहेर काढतात असे दृश्य दिसत आहे. हिंदुस्थानी लष्कराचे कर्नल शौर्य सिंह आणि लेफ्टनंट कर्नल अभिजीत सिंह यांनी हे असाधारण शौर्य दाखवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये 7 ते 18 टक्के कार्ड रद्द होऊ शकतात.
25 लाखांहून अधिक कार्ड डय़ुप्लिकेट असल्याचा अंदाज आहे. पेंद्राने राज्यांना या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 2024 मध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या डिजिटायझेशनमध्ये 5.8 कोटी बनावट रेशनकार्ड रद्द करण्यात आली. याअंतर्गत 80 कोटींहून अधिक लोकांना लाभ मिळत आहेत.