सैन्य भरतीच्या मागणीसाठी 50 तासांत 350 किलोमीटर धावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सैन्यदलात भरतीच्या मागणीसाठी तरुणाने राजस्थानच्या सीकरपासून दिल्लीपर्यंत धाव घेतली. त्याने 50 तासांमध्ये 350 किलोमीटर इतके अंतर कापले. नागौर येथील सुरेश भिचर याने सीकर ते दिल्ली हा प्रवास धावत पूर्ण केला. 29 मार्च रोजी रात्री 9 वाजता सीकरच्या जिल्हा स्टेडियममधून निघालेला सुरेश 2 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता दिल्लीला पोहोचला. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 सुरेश भिचर हा सीकर येथील संरक्षण अकादमीतून प्रशिक्षण घेत आहे. 2015 पासून तो सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप त्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. धावत दिल्ली गाठल्यावर सुरेश म्हणाला, ‘मला सैन्यात भरती व्हायचे आहे. दोन वर्षांपासून भरती झाली नाही. नागौर, सीकर, झुनझुन येथील तरुणांचे वय उलटून जात आहे.  तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी मी धावून दिल्लीत आलोय.’ भरती प्रक्रिया थांबल्यामुळे राजस्थानच्या चुरू, झुंझुनू, सीकर आणि नागौर जिह्यांना   फटका बसला आहे.  नोकरभरती सुरू करण्यासाठी सोशल मीडियावर प्रचारापासून ते धरणे निदर्शने केली जात आहेत.