मोठ्या सिलेंडरमधील गॅस नॉबच्या साहाय्याने काढून छोट्या टाकीत भरून विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली. त्यांच्याकडून 9 मोठे गॅस सिलेंडर, 22 लहान टाक्या, वजनी काटे, रोकड असा 49 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. शब्बीरउद्दीन बडेसाहेब अलालखान (38, रा. मार्केटयार्ड), बालाजी सतीश गावलगडदे (23) आणि प्रसाद तानाजी फावडे (23, दोघेही रा. स्वारेगट) अशी अटक वे केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, स्वारगेट परिसरातील अंबिका झोपडपट्टीत गॅसचा काळाबाजार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अंमलदार विल्सन डिसोझा यांना मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता तिघेजण मोठ्या टाकीतून छोट्या टाकीत गॅस भरताना आढळूले.
त्यानुसार पथकाने पुरवठा अधिकाऱ्यांच्या मदतीने तिघांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणाहून 49 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक अमृत चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, संतोष क्षीरसागर, रामदास गोणते, सुजीत पवार, एकनाथ कंधारे, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.



























































