खराडीत तरुणाला लुटणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तुला नीट गाडी चालविता येत नाही का ?’ असे बोलून टोळक्याने तरुणाला दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील 9 हजार 500 रुपये जबरदस्तीने काढून नेल्याची घटना 27 एप्रिलला खराडीतील मुंढवा पुलावर घडली होती.

याप्रकरणी कुणाल यलप्पा जाधव (20, रा. थिटे वस्ती, खराडी) याला चंदननगर पोलिसांनी अटक केले. बिभीषण सिरसट (26, रा. गवळीवस्ती, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिभीषण घरी चालले असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना तुला नीट गाडी चालविता येत नाही का? असे बोलून शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांना मारहाण करून 9 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी कुणाल जाधव याला अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.